कारण

Budget 2021 : जे जाहीर केलं, ते मिळणार कसं? आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

Union Budget 2021 Update : अर्थमंत्री निर्माला सितारमण (finance minister Nirmala Sitharaman) यांनी 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर त्यावर अनेक विरोधी पक्षातील नेत्यांकडून टीका होत आहे. महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Environment Minister Aaditya Thackeray) यांनीही देशाच्या अर्थसंकल्पावर आपली भूमिका मांडली आहे. (Budget 2021: How to get what was announced in budget, question of Aditya Thackeray)

बजेटमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत. उदाहरण द्यायचं झाल्यास हायड्रोजन मिशन एअर पोल्युशन बाबतीत केंद्राने घेतलेली भूमिका योग्य आहे, मात्र अनेक राज्यातल्या निवडणुका आहेत म्हणून त्या राज्यांमध्ये निधीची तरतूद अधिक करणे, ही भाजपची भूमिका न समजण्यासारखी असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी मत मांडलं आहे.

या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 20 लाख कोटी पॅकेज कोव्हिडसाठी  जाहीर केलं होतं, त्याचं काय झालं, याबद्दल जनतेला माहिती द्यावी, जे बजेट जाहीर केलंय, ते या राज्यांना कशाप्रकारे मिळणार तेही, पंतप्रधानांनी जाहीर करावं, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments