कारण

Budget 2021 : मेड इन इंडियाचं डिजीटल बजेट; देशाच्या इतिहासात सादर होतंय टॅबद्वारे बजेट

कोरोना संकटामुळे त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत.

काही वेळातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारचा यंदाचा हा नववा अर्थसंकल्प असणार आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डिजिटल बजेट सादर केलं जाणार असून आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं उचललेलं हे वेगळं पाऊल आहे. ‘मेड इन इंडिया’ या टॅबद्वारे हा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 2019 मध्ये चामड्याच्या बॅगमधून अर्थसंकल्पाचा दस्तऐवज सादर केला होता. त्यावेळी त्याला पारंपरिक बही-खात्याचे स्वरूप देण्यात आले होते.

यावेळेचा अर्थसंकल्प हा कागदी स्वरूपात उपलब्ध होणार नसून तो सॉफ्टकॉपी स्वरूपात उपलब्ध होईल. सर्वसामान्यांपर्यंत हे बजेट पोहचावं यासाठी union budget या अँपची निर्मिती केली आहे. या अँपद्वारे जनतेला हे बजेट वाचता येणार आहे

(Budget 2021: Made in India’s Digital Budget; The budget is presented in the history of the country through tabs)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments