आपलं शहरफेमस

राज ठाकरेंसाठी कोर्टात वकिलांची फौज, या तारखेस होणार पुन्हा सुनावणी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशी टोलनाका प्रकरणी कोर्टात हजर राहिले होते.राज ठाकरें बरोबर त्यांचे अनेक वकील उपस्थित होते. राज ठाकरे यांच्यविरोधात बेलापूर कोर्टाने वॉरंट काढला होता.

राज ठाकरे यांचे वकिल रवींद्र पाष्टे यांच्या नुसार राज ठाकरे यांच्या मॅटर साठी मनसे विधी विभागाचे अध्यक्ष किशोर शिंदे, राजीव शिरोडकर आणि विधी विभागाची संपूर्ण टीम न्यायलायात उपस्थित होती. “2014 मध्ये विष्णुदास भावे हॉल मध्ये माननीय राजसाहेबांनी टोलच्या संदर्भात जी लूट चालू होती त्या संदर्भात समाजाला आणि कार्यकर्त्याला केलेलं भाषण होत त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे”अस पाष्टे यांचं म्हणणं आहे.

भाषण प्रक्षोपक होत का त्यावर पाष्टे म्हणाले की ”मुळमुळीत शब्द समाजातील लोकांना समजत नाहीत. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांना कडवट पद्धतीने समजवायला लागतात.माननीय राज साहेबांनी सांगितलेलं भाषण लोकांना प्रक्षोपक वाटत, पण त्यांनी सत्य परिस्थितीची जाण करून दिलेली आहे.”

टोल हे मनसे कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आले. “राज ठाकरेंनी आदेश दिल्यानंतर कार्यकत्यांनी उत्स्फूर्त पणे आणि काही नागरिकही ह्यात सहभाग घेतात कारण ही लूटमार चालू आहे आणि कुठेतरी ही लूटमार थांबली पाहिजे हेच माननीय राजसाहेबांनी सांगितल.” वकीलांच म्हणणं आहे.

या आधी एकदा समंस बजावण्यात आलेला होता आणि त्या नुसार ते कोर्टात हजर राहिले होते. सांगण्यात येते की जेव्हा जेव्हा कोणत्या न्यायालयाने राज साहेबांना बोलवलं आहे तेव्हा तेव्हा ते कोर्टाचा आदर करत तिथे उपस्थित राहिले आहेत. आजही त्यांच्या सोबत वकील वर्ग जमलेला होता. मनसेचे विधी विभाग आणि जे जे राज साहेबांना मानतात ते सगळे आज न्यायालयाबाहेर जमलेले होते.

वॉरंट बद्दल सांगताना पाष्टे म्हणाले की ” वॉरंट मागच्या तारखेला कॅन्सल झालेला आहे. आज प्ली आणि बेल ऍप्लिकेशन साठी बोलावलं. 153, 501, 504 आयपीसी हे सेक्शन आहेत आणि मुंबई पोलिस ॲक्ट मध्ये 37 आणि 117 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हे संपूर्ण सेक्शन बेलेबल आहेत.”

निवडणुका जवळ आहेत आणि आत्ता हे प्रकरण आहे तर त्यावर राज ठाकरे यांचे वकिल म्हणाले की ” 2014 च हे प्रकरण आहे आणि आत्ता नवी मुंबई च हे इलेक्शन आहे तर असा असू शकत की त्यांच्या विरोधकांनी हा त्यांचे जुने प्रकरण काढण्याचा डाव केला असेल.”

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments