खूप काहीफेमस

Cameron Cuffy : एकसुद्धा धाव नाही, विकेट नाही, कॅच नाही, तरीही पटकवला मॅन ऑफ दी मॅच…

वेस्ट इंडिजचा तुफानी गोलंदाज कैमरून कफी यांचा आज 51 वा वाढदिवस आहे. हा तो गोलंदाज आहे ज्याने भारताच्या विरुद्ध 1994 मध्ये टेस्ट करियरला सुरुवात केली.त्यांची तुलना 70च्या दशकात वेस्ट इंडीजचा काळा वादळ ओळखला जाणाऱ्या गोलंदाजांच्या फौजेचा भाग होते ज्यात जोएल गार्नर, पैट्रिक पैटरसन आणि कर्टली एंब्रोस यांच्या बरोबर केली गेली.

कैमरून कफी यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1970 ला सेंट विंसेंट एंड द ग्रेनाडियंस मध्ये झाला होता. कैमरून ने भारताच्या विरुद्ध 1994 मध्ये टेस्ट करियरला सुरुवात केली. कैमरून ने आपल्या 15 मॅचच्या टेस्ट करियर मध्ये सचिन तेंडुलकरला 3 वेळा आऊट केलं आहे. कफिने वेस्ट इंडीज साठी 15 टेस्ट मॅच आणि 41 वनडे मॅच खेळले पण हळू हळू वेळेनुसार प्रदर्शनाच्या निरांतरमुळे ते काळा वादळ ओळखला जाणाऱ्या गोलंदाजांच्या फौजेचा भाग होता होता राहून गेले.

वनडे क्रिकटमध्ये कोणतेच रन न बनवता, एकही विकेट न घेता, एकही कॅच न पकडता त्यांना मैन ऑफ द मॅच चा किताब मिळाल्याचा विक्रम आहे. त्यांना हा पुरस्कार झिम्बाब्वेच्या विरुद्ध 23 जुन 2001 ला कोका कोला टूर मध्ये मिळाला होता. त्या मॅचमध्ये वेस्ट इंडीजने 5 विकेट वर 266 रन बनवले होते.

कैमरून कफी यांनी आपल्या करियर मध्ये 15 टेस्ट मॅच मध्ये 43 विकेट घेतले आणि 41 वनडे मधे 41च विकेट घेतले.प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये 86 मॅच खेळून 252 फलंदाजांना आपला शिकार बनवल. त्यांच्या नावावर 98 मॅच मध्ये 105 विकेटचा विक्रम आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments