आपलं शहर

मुकेश अंबानींच्या ‘अँटिलीया’ बाहेर संशयास्पद कारमध्ये जिलेटिनच्या 20 काठ्या जप्त,

देशाचे सगळ्यात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद कारमध्ये जिलेटीनच्या 20 काठ्या जप्त केल्या.मुंबई पोलिस वेळेवर घटनास्थळी दाखल झाली. डॉग स्क्वाड आणि बॉम्ब निरोधक टीम बरोबर एटीएसची टीम सुद्धा तिथे दाखल झाली.

स्कॉर्पिओची एसयूवी गुरुवारी मुंबईच्या परेड रोडवर अँटिलीया बाहेर उभी होती.ती कार बुधवारी रात्री 1 वाजल्यापासून तिथे उभी केली होती.अजून एक गाडी होती जी एनोवा होती, त्या गाडीचा ड्रायव्हर एसयूवी अँटिलीया बाहेर उभी करून गेला होता.

संशयास्पद कार दिसल्यावर अंबानींच्या घरातील सेक्युरीटीने पोलिसांना कळवल.तेव्हा डॉग स्क्वाड आणि बॉम्ब निरोधक टीम तिथे दाखल झाली आणि शोधकार्यात त्यांनी 20 जिलेटीनच्या काठ्या जप्त केल्या त्याचबरोबर काही नंबर प्लेट्स पण मिळाल्या ज्या अंबानींसाठी असलेल्या सेक्युरीटी कारच्या नंबर प्लेटशी समान आहेत.मुंबई पोलिस या मागे कोणता आतंकवादी अँगल नाहीना याचा शोध घेतायत.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments