आपलं शहरखूप काही

आजही गावागावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेची अस्मिता लोक जागृत ठेवत आहेत हे आपले भाग्य आहे, अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोणाच्या नियमांचे पालन करत महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात शिवजयंती साजरी होऊदे अस आव्हान केलं आहे.”महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मांसाहेबांसमोर आज शिवजयंतीदिनी पुन्हा एकदा नतमस्तक होतो.” असा मानाचा मुजरा करत त्रिवार वंदन केले.

महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौऱ्याची आणि त्यागाची जयंती आहे.स्वराज्यातील मावळ्यांच्या शौर्याला, त्यागाला, राष्ट्रभक्तीला वंदन करताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे युगपुरुष, महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले आणि त्यांना आदर्श मानणारे कोट्यवधी युवक, आजही गावागावात महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवत आहेत, हे या भूमीचं, आपल्या सर्वांचं भाग्य आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.

आधुनिक मावळ्यांना वंदन करताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्राच्या युवा शक्तीला, तमाम बंधू भगिनींना, जगभरातील शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments