कारण

Budget 2021 :1947 पासून आतापर्यंत असे झाले बजेटच्या सादरीकरणात बदल…

1947 मध्ये पहिले देशाचे बजेट सादर करण्यात आले होते आणि तेव्हापासून आतापर्यंत त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. यंदाचे बजेट तर चक्क पूर्णपणे डिजिटल असणार आहे. (Changes occur in Presentation of Budget since 1947 )

आज केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण 2021-22 चे बजेट सादर करत आहेत. हा देशाचा पहिला पेपर लेस बजेट असणार आहे, जो पूर्णतः डिजिटल असणार आहे. हे पहिल्यांदाच होत आहे की, बजेट ची छापील प्रत काढली जाणार नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने पपेरलेस बजेटची घोषणा केली आहे.

तसं बघता मोदी सरकारने सुरवातीपासूनच डिजिटलीकरणाला प्रोत्साहन दिलं आहे आणि याचीच ही नवीन सुरुवात आहे. सरकारद्वारा सुरु करण्यात आलेली ही एक नवीन संधी आहे. खरतर यापूर्वीच दोन राज्यांनी डिजिटल बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. उत्तराखंड आणि त्यामागून 2018 मध्ये आसामनेही ई-बजेट सादर केले होते होते. ई-बजेटचे मुख्य उद्देश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे हाच आहे. ययाशिवाय या बजेटमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तर चला जाणून घेऊयात हे बदल कोणते आणि कसे झाले.

यावर्षी सादर झाले होते पाहिले बजेट :

देशाचे पहिले बजेट 1947 मध्ये छापले गेले होते. त्यानंतर ही एक परंपराच चालू झाली. दरवर्षी बजेटच्या दस्ताविजांची छपाई होते, मग त्यांना सीलबंद करून ट्रकमधून संसद भवनात घेऊन जाण्यात येते.परंपरेनुसार, छपाई प्रक्रिया सुरु होण्याआधीच नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा सेरेमनीचे आयोजित केली जाते. हे आयोजन बजेट सादरीकरणाच्या 15 दिवस आधी केले जाते.

पहिले ब्रिफकेस घेऊन यायचे वित्तमंत्री :

पूर्वी एका चामड्याच्या ब्रिफकेस मधून वित्तमंत्री बजेट संसद भवनात घेऊन जात असत. परंतू, निर्मला सीतारमण यांनी ही परंपरा बंद करून गेल्यावर्षी ‘बही-खाता’ सुरु केले. या व्यतिरिक्त 2016 मध्ये रेल्वे बजेटला सामान्य बजेटमध्ये सामील करण्यात आले होते. त्याच वर्षी बजेटची तारीख बदलून 1 फेब्रुवारी करण्यात आली.

1999 पर्यंत फेब्रुवारी अखेरीस सादर होते बजेट:

साल 1999 पर्यंत बजेटची घोषणा फेब्रुवारी अखेरीस होत सायंकाळी पाच वाजेपर्यंत होत असे. परंतू जेव्हा अटल बिहारी वाजपायीजी प्रधानमंत्री झाले, तेव्हा तत्कालीन वित्त मंत्री यशवंत सिन्हा यांनी सकाळी अकरा वाजता बजेट सादर करण्यास सुरुवात केली.

या परंपरेचा अंत :
बजेट सादर करण्यापूर्वी ज्या आर्थिक सर्वेक्षणाच्या प्रति काढल्या जातात त्या आता डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे सर्व सदस्यांना पाठविण्यात येतील. या व्यतिरिक्त राष्ट्रपती व केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सितारमण यांच्या भाषणाची छापील प्रत सदस्यना दिली जाईल.

सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बनवण्यात आलेला ऍप :
डिजिटल बजेट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी एक ऍप लाँच केला आहे.
ह्या ऍप च नाव ‘ Union Budget Mobile App’ आहे. हा ऍप सामान्य जनता आणि सदस्यांपर्यंत बजेट ची माहिती पोचवण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

हा ऍप आपण हिंदी आणि इंग्रजी ह्या दोन्ही भाषेत वापरू शकतो. सोबतच ह्या ऍप वर बजेटची माहिती मिळवणं खूप सोप आहे. ह्यामध्ये युनियन बजेट चे १४ डोकमेंट्स असतील ज्यांमध्ये अंनुअल फाईनान्शिअल स्टेटमेंट, डिमांड फॉर ग्रँट्स, फायनान्स बिल हे सर्व सामील आहेत. ‘ Union Budget Mobile App’ ला आपण अँड्रॉइड आणि iOS दोन्ही मध्ये वापरू शकतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments