आपलं शहर

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय 16 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू होणार

कोरोना महामारीमुळे बंद असलेले मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय जवळपास अकरा महिन्यांच्या कालावधीनंतर येत्याच 16 फेब्रुवारी रोजी सर्वांसाठी खुलं होणार आहे. सर्वात आधी संग्रहालयातील 18 गॅलरींपैकी 4 गॅलरी उघडण्यात येणार आहे. नैसर्गिक इतिहास, भारतीय कलाकृती, आणि दागिन्यांची गॅलरी, तसेच चिल्ड्र्न म्यूझियम प्रेक्षकांसाठी उघडण्यात येणार आहेत.

संग्रहालय आठवडाभर सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत उघडे असणार आहे. लॉकडाऊन नंतर टिकीटांचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. आधी प्रौढांसाठी 100 रूपये आकारले जायचे तेच आता अर्ध्या किंमतीत म्हणजे 50 रूपये दर असणार आहे. तसेच लहान मुलांसाठी 30 रूपयांऐवजी 20 रूपये दर आकारला जाईल.

नियमांचे पालन केले जाईल

कोरोना साथीला दूर ठेवण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्यास आता प्रत्येकजण प्राधान्य देत आहे. सिनेमागृह, लग्न समारंभ इत्यादीसारख्या सामाजिक कार्यक्रमांच्या ठिकाणी सोशल डिस्टंसींग, मास्क घालणे या आरोग्यविषयक गोष्टी अनिवार्य आहेत.

संग्रहालयातही तापमान तपासणी आणि मास्क अनिवार्य असतील. तसेच संग्रहालयात प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझर असतील आणि शौचालयांची दिवसातून अनेकदा सफाई करण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments