कारण

Sanjay Rathod : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची राज्यभर गाजणाऱ्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरूणीने पूणे येथे 7 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती. तीने आत्महत्या केल्यानंतर सोशल मिडियावर काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिपमधील एक इसम हा राज्य सरकारमधील एक मंत्री असल्याची माहिती सगळीकडे फिरू लागली. दरम्यान, भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या नावाचा उल्लेख केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.

या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील वातावरण गरम झाल्याचे चित्र आहे. असे असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर या प्रकरणावरील आपले मौन सोडले आहे. आज मुख्यमंत्री माध्यमांसोबत बोलत असताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. “या प्रकरणाची नीट चौकशी करण्यात येईल. जे सत्य आहे तेच जनतेसमोर येईल. ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.” असे मुख्यमंत्री म्हणाले.

“या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. पण गेले काही महिने आपल्या असे लक्षात आले आहे की आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे असादेखील प्रयत्न होता कामा नये. त्याचबरोबर सत्य लपवण्याचा देखील प्रयत्न होऊ नये. त्यामुळे जे सत्य असेल ते चौकशी झाल्यावर जनतेसमोर येणार” असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाल्याप्रमाणे जे सत्य असेल तेच जनतेसमोर यावे हीच सर्वांची मागणी आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments