खूप काही

Indian Market : चिन्यांना धुडकावलं, मेड इन इंडियाच्या ऍपला मोठी पसंती

लॉकडाऊनमध्ये अनेक बिझनेसनी चढ उतार बगितला. चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरस मुळे चीनी  कंपन्यांपासून अनेक भारतीयांनी पाठ वळवली आहे. 2020 मध्ये चीनी ऍपची इंस्टॉलमेंटची संख्या घटली तर भारतीय ऍपची वाढली.

२०२१ मध्ये ‘स्टेटस ऑफ मार्केटिंग इन इंडिया’ या अहवालात मोबाईल वर्क रिलेशनशिप आणि विपणन विश्लेषणाची जागतिक संस्था अ‍ॅप्सफ्लायरने म्हटले आहे की अर्ध-शहरी भागाच्या मदतीने भारताची अ‍ॅप इकॉनॉमी वाढली आणि घरगुती अ‍ॅपने मोबाइलवर वर्चस्व गाजवले. ऐप्सफ्लायरचे प्रबंधक संजय त्रिसाल यांच म्हणणं आहे की चीनी ऍपची बाजारात मागणी 29% कमी झाली आहे आणि भारतीय ऍप ची 40% मागणी वाढली आहे.

अमेरिका, इस्राएल, रुस, जर्मनी यांनी बाजारात त्यांचे ऍप घेऊन पाय ठेवला आहे. 1 जानेवारी ते 31 नोव्हेंबर 2021पर्यंत अरब ऍप इंस्टॉलमेंटचीसंख्या 7.3ने वाढली आहे ज्यात शॉपिंग, फूड, गेमिंग असे अनेक ऍप चा समावेश आहे. भारत सरकारने टिकटॉक या ऍप वर बंदी घातल्या नंतर बाजारात अनेक व्हिडिओ बनवणार ऍपने प्रसिद्धी जमा केली.

अर्ध- शहरी भागातील वापरामुळे भरतीय ऍप ची मागणी वाढली आहे. भारतातील सगळ्यात ज्यास्त लोकसंख्या असलेलं राज्य, उत्तर प्रदेश मध्ये 12.10 टक्क्यांवर एनओई बजाराच नेतृत्व केलं जो महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे 11.49 टक्क्यांनी मागे राहिला. स्वस्त मोबाइल डेटामुळे टायर 2,3,4 शहरांमध्ये गेमिंग आणि मनोरंजनासाठी मोबाईलचा वापर वाढला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments