खूप काही

क्रिस मॉरीस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

आज चेन्नई येथे पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव चालू आहे. या लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा ऑल राऊंडर क्रिस मॉरीस हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने मॉरीसला तब्बल 16.25 कोटी रूपयांना विकत घेतले आहे. (Chris Morris becomes most expensive buy in the history of IPL)

याआधी IPL 2015 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने युवराज सिंहला 16 कोटींना विकत घेतले होते. त्यानंतर पाच वर्षे कोणत्याही खेळाडूवर 16 कोटींच्या वर बोली लागली नव्हती. मात्र आज युवराज सिंहचा रेकॉर्ड मोडत क्रिस मॉरीस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू झाला आहे.

75 लाखांवरून तब्बल 16.25 कोटी

आयपीएल लिलावासाठी क्रिस मॉरीसची बेस प्राईज 75 लाख इतकी होती. मॉरीसला आपल्या संघात आणण्यासाठी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेन्जर्स बँग्लोर आणि पंजाब किंग्स यांच्यात जबरदस्त रस्सीखेच सुरू होती. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने बोली लावायला सुरूवात केली आणि अखेरीस ते यशस्वी झाले. त्यामुळे 75 लाख बेस प्राईज असलेला क्रिस मॉरीसला तब्बल 16.25 कोटींना राजस्थान रॉयल्सने विकत घेतले.

दरम्यान, क्रिस मॉरीसने आतापर्यंत 70 आयपीएल सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 80 बळी आणि 551 धावा त्याच्या नावे आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments