आपलं शहर

CIDCO देतेय नवी मुंबईमध्ये स्वत:च्या मालकीचा बंगला बांधण्याची संधी

आपले स्वत:च्या मालकीचे एक घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण दिवसरात्र एक करतो. मुंबईसारख्या महानगरात तर स्वत:चे घर असणे हे म्हणजे दिव्यच आहे. एखादी भाड्याची खोली जरी मिळाली तरी आपल्याला समाधान असते. मात्र तरीही आपलं स्वत:चं घर ते स्वत:चं ना राव. तुमची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई येथे सिडको महामंडळातर्फे खास प्रॉजेक्ट हाती घेण्यात आला आहे.

सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र (CIDCO) यांच्याकडून नवी मुंबईमध्ये नवीन पनवेल, खारघर, घणसोली, ऐरोली आणि नेरूळ नोडमध्ये 106 निवासी भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेत. रो-हाऊस, बंगलो आणि निवासी इमारतींसाठी हे भूखंड उपलब्ध करण्यात आले आहेत.

CIDCO ने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे ज्यांची नवी मुंबईत स्वत:च्या मालकीचे घर असण्याची इच्छा होती त्या सर्वाकरिता ही सुवर्णसंधी सिडकोने निर्माण केली आहे.

असा करा अर्ज
या योजनेची ऑनलाईन अर्जाची नोंदणी 10 फेब्रुवारी रोजी सुरू झाली आहे. या योजनेसाठीची ई-निविदा प्रक्रिया 12 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. ही प्रक्रिया 1 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. तसेच, ई-लिलाव प्रक्रिया 3 मार्चला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू राहील.

दरम्यान, या योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जदाराने https://eauction.cidcoindia.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. या संकेतस्थळावर अर्जदारांना सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कुठे किती भूखंडांची विक्री
घणसोली: 38, नवीन पनवेल: 28, खारघर: 15, ऐराली: 13, नेरूळ: 12, अशा एकूण 106 भूखंडांची विक्री करण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments