फेमस

CM Uddhav Thackeray Live : लॉकडाऊन होणार की नाही? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात मजबुरी…

अर्थसंल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांसोबत आज पत्रकार परिषद घेतली. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देत सरकारची बाजू मांडली आहे. यातच आता महाराष्ट्रात वाढत्या कोरोनावर देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तरले. (Will there be a lockdown or not?)

राज्यात कोरोनाची वाढती आकडेवारी हे आता पुन्हा चिंतेचे कारण बनत आहे. यावर पत्रकार परिषदेत (CM Uddhav Thackeray Live)पत्रकाराने आता लॉकडाऊन लागेल का? असा प्रश्न विचारता मुख्यमंत्री यांनी विदर्भात कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याचे सांगितले. मागील रविवारी (21फेब्रुवारी) जनतेला नियमांचे पालन करा आणि लॉकडाऊन टाळा असे आवाहन केले होते. पण तरी देखील कोरोनाचे रुग्ण आता वाढत आहेत. त्यामुळे नाईलजास्तव तसेच मजबुरी म्हणून लॉकडाऊनची वेळ येऊ नये असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यामुळे आता आणखी कोरोनाची परिस्थिती वाढली तर लॉकडाऊन लागू शकत यात कदापि शंका नाही.

सदर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी कोरोनासोबत संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे देखील सांगितले. तसेच आता सदर वनमंत्री खात माझ्याकडे असल्याचे ते सांगतात. विरोधकांच्या प्रश्नांवर टीकाटिपणी करत सडेतोड उत्तर त्यांनी यावेळी दिले. केंद्राकडे मोर्चा वळवत राज्याचे हक्काचे जीएसटी (GST) चे पैसे अजून मिळाले नसल्याचे देखील ते सांगतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments