कारण

पोहरादेवी येथील गर्दीवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

बीड येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड अडचणीत सापडले होते. भारतीय जनता पक्षानेही त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. या प्रकरणात नाव आल्यापासून संजय राठोड नॉट रिचेबल होते. मात्र आज जवळपास 15 दिवसांनी संजय राठोड सर्वांसमोर आले आहेत. राठोड यांनी बंजारा समाजाची काशी मानल्या जाणार्या पोहरादेवी गडावर जाऊन आज दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी प्रशासनाचे आदेश पायदळी तुडवत पोहरादेवी गडावर गर्दी केली होती.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि याच पाश्वभूमीवर राज्य सरकारने सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी केली होती. मात्र आज पोहरादेवी गडावर या निर्णयाविरूद्ध घटना घडली. याप्रकरणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा व पोलिस प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना बंदी घातल्यानंतर त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्री हे नियम पाळत नाहीत असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments