कारण

फोटोग्राफर मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्र्यांचा सेल्फीचा क्लास…

आज (05 फेब्रुवारी रोजी) सकाळीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुलढाणा, औरंगाबाद दौऱ्यासाठी निघाले. सकाळी साडे नऊच्या सुमारास ते लोणार सरोवरावर पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत शासकीय अधिकारी तसेच मंत्री राजेंद्र शिंगणे देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी घेतला स्लेफी क्लास…
फोटोग्राफी ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी किती प्रिय आहे याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. लोणार सरोवराचं निसर्गरम्य देखणं रूप पाहून मुख्यमंत्र्यांना फोटो काढायचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये लोणार सरोवराची छायाचित्रे टिपली.

लोणार सरोवराची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर औपचारिक फोटो सेशन करतेवेळी मंत्री राजेंद्र शिंगणे सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु, त्यांना सेल्फी घेता येत नव्हता. हे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंगणे यांच्या हाताला हात लावून एक सेल्फी घेतला.

जाणून घेऊया लोणार सरोवराविषयी

लोणार सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.

लोणार सरोवरात जैवविविधता विकसित झालेली आहे. या ठिकाणी मंदिरांची संख्या अधिक आहे, त्यामुळे याठिकाणी वन पर्यटन किंवा मंदिराच्या भेटी अशा पर्यायांपैकी एका पर्यायाची निवड करून त्याच प्रस्तावावर काम करावे. या ठिकाणची वनसंपदा धोक्यात येऊ नये, यासाठी मर्यादितच प्रवेश ठेवावा. लोणार सरोवराचा विकास रणथंबोरच्या धर्तीवर करता येऊ शकतो काय याचीही पडताळणी करावी, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

(Cm Uddhav Thackeray teach Selfie To Rajendra Shingane over Lonar lake visit)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments