कारण

CM Thackeray Live: सामान्य जनतेला लस कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांचे मिश्किल उत्तर

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले वर्षभर संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये होते. या महामारीच्या काळात अनेकांनी आपले प्राण गमावले. हळूहळू परिस्थिती सुधारायला लागली आणि जग अनलॉक व्हायला सुरूवात झाली. महाराष्ट्रही सावध पवित्रा घेत टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊ लागला. गेले काही महिने महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे पाहायला मिळत होते.

मात्र आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्यातील लसीकरण मोहिमेसंदर्भात भाष्य केले.

“महाराष्ट्रात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये आतापर्यंत 9 लाखांच्या आसपास कोविड योद्ध्यांना लसीकरणाची सुरूवात केलेली आहे. सुरूवातीच्या काळात लसीकरणासंदर्भात काहींना शंका होती की याचे काही साईड इफेक्ट नाही ना. तर आता 9 लाखांच्या आसपास कोविड योद्ध्यांना लस दिल्यानंतर त्यांना कोणतेही साईड इफेक्ट आढळून आलेले नाहीत,” असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच राहिलेल्या सर्व कोविड योद्ध्यांना लस घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

“उपरवाले की मेहेरबानी..”
सरकारने सर्वात आधी कोविड योद्ध्यांच्या लसीकरणास सुरूवात केली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला आपले लसीकरण केव्हा होणार याची ओढ लागली आहे. यावरच मुख्यमंत्री ठाकरेंनी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या एक वाक्याचा उच्चार करत त्याचे उत्तर दिले.

“मग दुसरा प्रश्न येतो, त्यांना तर आपण देतोय आम्हाला कधी मिळणार? आता आम्हाला कधी मिळणार हे सगळं काही जसं पूर्वी शिवसेनाप्रमुख सांगायचे ‘उपरवाले की मेहेरबानी’. म्हणजे केंद्र सरकार हा सगळा कार्यक्रम ठरवतो आहे. आणखी दोन लसी येणार आहेत, तेव्हा आपल्याकडे लसी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि तेव्हा मात्र आपण जनतेसाठी हा कार्यक्रम खुला करू.” असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments