आपलं शहर

मुंबईतील कॉलेज 15 फेब्रुवारीनंतरही बंदच, BMC कडून नवी तारीख जाहीर…

संपूर्ण राज्यात येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, मात्र या निर्णयाला मुंबईतील महाविद्यालये अपवाद असणार आहेत. मुंबईतील महाविद्यालयांना उघडण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Colleges in Mumbai closed after February 15)

टप्प्याने टप्प्याने शाळा, विद्यालये, महाविद्यालये आणि इतर शालेय संस्था सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार मुंबईव्यतिरिक्त इतर भागातल्या सर्व शाळा पन्नास टक्के उपस्थित सुरू झाल्या आहेत. मात्र मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शाळा, विद्यालये, महाविद्यालये सुरू करण्याबाबत कोणताच निर्णय अद्याप घेतलेला नाही.

राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याचे निर्देश जरी राज्य सरकारने दिले असले तरी तिथल्या स्थानिक प्रशासनाकडे त्यासंबंधी सर्व अधिकार देण्यात आले आहेत. स्थानिक प्रशासनाने विद्यालय, कोरोना परिस्थिती या सर्वांचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घ्यावा, याचे आदेश दिले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांची काळजी घेऊन आणि योग्य ती काळजी घेऊन महाविद्यालये सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा निर्णय मुंबई परिसरातील महाविद्यालयांना लागू नसणार आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येणारी महाविद्यालये सुरू करण्याबाबत 22 फेब्रुवारीनंतर निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण पालिकेकडून देण्यात आले आहे. (Colleges in Mumbai closed after February 15)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments