खूप काही

10 वी, 12 वीच्या परीक्षांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय…

फेब्रुवारी महिना संपताच अनेक परीक्षा सुरु होतील, इयत्ता 10 आणि 12 परीक्षांसाठी अनेक विद्यार्थी तयारीलाही लागले आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे, मात्र रिपीटर आणि श्रेणीसुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा धक्का शालेय शिक्षण विभागाने दिला आहे.(Complete syllabus in 10th and 12th examinations)

रिपीटर आणि श्रेणीसुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी लागणार आहे. कोरोना काळात अभ्यासक्रम न शिकवता आल्यामुळे किंवा ऑनलाइन क्लासमुळे विद्यार्थ्यांची मनस्थिती लक्षात घेऊन 10 वी आणि 12 च्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तशाप्रकारच्या सुचनाही अनेक शांळांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र पुन्हा परीक्षा देणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रमात सुट मिळणार नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभाग मंडळाकडून येत्या महिन्यांमध्ये 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार नियोजन सुरु केलं आहे. (Complete syllabus in 10th and 12th examinations)

केव्हा परीक्षा, केव्हा निकाल…
इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 29 मे 2021 या दरम्यान होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन नसून विद्यार्थ्यांना विद्यालयात येऊन द्यावी लागणार आहे. तर बारावी परीक्षेचा निकाल साधारणत: 2021 च्या जुलै महिन्यात लागण्याची शक्यता आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा एप्रिलच्या 29 तारखेपासून मे महिन्याच्या 31 तारखेदरम्यान होणार आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल 2021 मधली ऑगस्ट महिन्यात पाहायला मिळणार असल्याची शक्यता शिक्षण विभागाने वर्तवली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments