आपलं शहर

Maharashtra Corona Update: मुंबई लोकल पुन्हा थांबण्याची शक्यता ? रेल्वेने दिले उत्तर..

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची वाढती संख्या लक्षात घेता अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मंगळवारी वरिष्ठ अधिकार्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली आणि परिस्थितीची माहिती घेतली.

महाराष्ट्रातील कोरोना वाढण्यासाठी लोकल ट्रेन जबाबदार धरल्या जात आहेत आणि असेच प्रकार वाढत राहिले तर पुन्हा एकदा मुंबई लोकल बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई लोकल 1 फेब्रुवारीपासून सुरू असल्यामुळे कोरोना विषाणूची प्रकरने वाढत असल्याचे तपासात दिसून आले आहे.

डीएनएने दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांनी मास्क घालाने आणि कोरोना संबंधित मार्गदर्शक सूचना पाळाव्यात असे आवाहन केले आहे.

मुंबई लोकल बंदीच्या प्रश्नावर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर म्हणाले की, “कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेत आहोत आणि पश्चिम रेल्वे सर्व आवश्यक अशी पावले उचलत आहे.” आम्ही स्वच्छता करीत आहोत आणि प्रवाशांच्या सोयीसाठी, आम्ही 300 हून अधिक बुकिंग काउंटर उघडले आहेत, जिथे मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जाते. सध्या 1300 ट्रेन चालवल्या जात असून आम्ही राज्य सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळत आहोत.

सुमित ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, सध्या मुंबई लोकल पुन्हा बंद करण्याचा विचार केला जात नाही. ते म्हणाले की, सरकारने केवळ खबरदारी घेण्याचे व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यांनी सांगितले की राज्य सरकार आणि बीएमसीच्या मदतीने आमची टीम कोविडशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणार्‍यां लोकांवरही दंड आकारत आहे.

आतापर्यंत सुमारे 2400 जणांवर कारवाई करत सुमारे 3 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्व स्थानकांवर नियमितपणे मास्क घालण्याची घोषणा केली जात असून तसे नाही केल्यास दंड आकारला जात आहे.

मुंबई लोकल हा हॉटस्पॉट?

बीएमसीच्या आकडेवारीनुसार, लोकल ट्रेन सुरू करणे हेही महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे प्रमाण वाढण्याचे एक कारण आहे. 1 फेब्रुवारी रोजी, सुमारे 400 प्रकरणे दररोज नोंदविली जात होती परंतु फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस ते 500 ओलांडले. 13 फेब्रुवारीपर्यंत ही प्रकरणे वाढून 599 वर गेली. 20 डिसेंबर रोजी डिसेंबरपासून सर्वाधिक 897 नवीन प्रकरणे नोंदली गेली. सध्या, पश्चिम आणि मध्य मार्गावर 95 टक्के लोकल सेवा सुरू झाल्या आहेत, ज्यावर सुमारे 22 लाख लोक प्रवास करतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments