कारण

सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणापासून, WFH ते काम दोन शिफ्टमध्ये; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मुख्यमंत्री यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधत नागरिकांना कोरोनापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यातच गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे देखील आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. याच अनुषंगाने आता मुख्यमंत्री यांनी मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये करण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत.

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना आज दिल्या.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आपण या नव्या पद्धतीच्या कामाची सुरुवात करून पाहू ज्यामध्ये कामे पण संपूर्ण क्षमतेने व व्यवस्थित पार पडतील आणि कोरोनाचा धोकाही कमी राहील. तसेच, मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे फ्रंटलाईन कर्मचारी म्हणून प्राधान्याने लसीकरण करावे याबाबत नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले.

मंत्रालयात दररोज येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रवेशापूर्वी तापमान पाहण्यात यावे तसेच त्यांची अँटीजेन चाचणी करण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी जेणे करून मंत्रालयात संसर्ग असलेली व आजारी व्यक्ती येणार नाही याची खात्री करता येऊ शकेल यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. यासोबतच मंत्रालयात तसेच राज्यातील इतरही शासकीय व निमशासकीय कार्यालयांत योग्य ती जंतुनाशके असावीत, वारंवार फवारणी करून स्वच्छता राहील हेही पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments