कारणफेमस

राज ठाकरेंना कोर्टाचा दिलासा; सरकारी वकील देखील या प्रकरणी झाले शांत

नवी मुंबईत टोल विषयक भडकावू भाषण केल्या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविलेल्या राज यांना आज (6फेब्रुवारी) वाशी कोर्टाने समन्स पाठविले होते. याला राज ठाकरे हजर राहत जामिनीची मागणी करणार होते. कोर्टात राज यांची बाजू मांडण्यात त्यांच्या वकिलांना यश मिळाले असून कोर्टाने राज ठाकरेंना दिलासा देत त्यांचा जामीन मंजुर केला आहे. (Court Grant bail to Taj Thackeray)

 

काय होता राज ठाकरेंवर गुन्हा?

साल 2014, दिवस होता 26 जानेवारीचा, नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात राज ठाकरे यांची एक सभा झाली होती. राज्यभरातील टोल वसुली बाबत भाष्य करताना राज ठाकरे यांनी भर सभेत संताप व्यक्त केला होता. याच सभेत टोल विरोधात भडकावू भाष्य केल्यानंतर समस्त राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट वाशी टोलनाक्यावर तोडफोड करत आपला आक्रोश दर्शविला.

यात भडकावू भाषणाचे पडसाद थेट असे विपरीत घटनेत उतरल्यामुळे राज ठाकरे यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याशिवाय मनसे नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळे व त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती.

2018 साली यापूर्वी कोर्टाकडून राज ठाकरेंना समन्स मिळाला होता. आणि आज कोर्टाने ‘राज ठाकरे हाजीर हो’ असा समन्स पाठविला होता. राज ठाकरे यांनी कोर्टात उपस्थिती दर्शविली. यावेळी त्याची बाजू मांडणारे वकील अक्षय काशीद, निलेश बागडे व किशोर शिंदे यांची टीम जामीन मिळवून देण्यासाठीची प्रक्रिया हाताळणार होते. याला यश आले असून आता कोर्टाकडून राज यांना दिलासा मिळालेला आहे. विशेष म्हणजे सरकारी वकील यांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा विरोध केलेला नाही.

राज ठाकरे, दूरदृष्टी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची राजकारणात एक वेगळीच ख्याती आहे. सत्तेत नसताना देखील आपल्या सभेसाठी हजारोंची गर्दी जमविणारे राज ठाकरे त्याच्या याच भाषण कौशल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत चक्क त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आपल्या कौशल्यामुळेचं राज ठाकरे गोत्यात सापडले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments