आपलं शहरखूप काही

CM Uddhav Thackeray Live | महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली भीती…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे जनतेशी संवाद साधला. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासनाने काही नियम जारी केले आहेत. अमरावतीची स्थिती चिंताजनक असल्यामुळे तिथे उद्या संध्याकाळपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे.

“अनेक लोक मास्क न घालता फिरतायात. सॅनीटायजरचा वापर करत नाहीत. गर्दी करतात, सोशल डीसटनसिंग पाळत नाहित अश्या अनेक कारणांमुळे रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.आपल्याला वाटल कोरोना गेला पण असा काही नाहीये, पाश्चिम देशांमध्ये अजूनही कडक लॉकडाऊन आहे. आपल्याकडे हलका केला तर लोकांनी नियम पाळण बंद केलं” अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एका दिवसात राज्यात 6,900 रुग्ण सापडले. पुणे, मुंबई, अमरावती इथली स्थिती चिंताजनक आहे. लॉकडाऊन हवा की नको हे तुम्ही ठरवा असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला आहे. 

कोणालाही घरात बंद होऊन बसायच नाहीये.लोकांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या त्या नुसार लॉकडाऊन हलका करून मंदिरे उघडण्यात आली, लोकल चालू केल्या पण लोकांनी मास्क लावणं, सोशल डीसटनसिंगच पाळण करण बंद केलं आणि आता परिस्थिती सुधारलेली पुन्हा बिगडत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना पुन्हा एकदा झपाट्याने पसरत आहे तर अश्या परिस्थितीमध्ये परत एकदा लॉकडाऊन करायचा की नाही हे तुम्ही ठरवा असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी जनतेला विचारला. एका आठवड्यात जर रुग्णांची संख्या आटोक्यात आली नाही तर लॉकडाऊनवर निर्णय घेलता जाणार.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments