आपलं शहर

Lockdown Again : नवी मुंबईत कोरोना वाढतोय, सोशल डिस्टंसिंग फाट्यावर…

“कोरोना” नावाच्या महाभयानक विषाणूमुळे गेला वर्षभर संपूर्ण जगालाच लॉकडाऊन व्हायला लागले होते. या महामारीच्या काळात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हळूहळू परिस्थिती सुधारायला लागली आणि जग अनलॉक व्हायला सुरूवात झाली. महाराष्ट्रही सावध पवित्रा घेत टप्प्याटप्प्याने अनलॉक होऊ लागला. यावर अनेकवेळा राज्य सरकारवर टिका देखील झाली. मात्र राज्य सरकारने आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या टीमने संयमाने निर्णय घेतले.

आता सर्वकाही आधीसारखेच चालू झाले आहे. सर्वजण आधीसारखेच रस्त्यांवरती फिरू लागले आहेत. मात्र हेच फिरणं कुठेतरी आपल्यावर पुन्हा लॉकडाऊन होण्याची वेळ नाही ना आणणार ही दक्षता आपण घेतली पाहिजे. कारण कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलं नाही आहे. म्हणूनच राज्य सरकारने कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग ठेवणे, वारंवार हात धुणे या गोष्टी नागरिकांनी नियमितपणे करण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेस केले आहे.

नवी मुंबईत कोरोना वाढतोय..

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दररोज 80 ते 90 इतकी वाढली आहे. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर या परिस्थितीतून सावरण्यासाठी आणि या विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, नवी मुंबईतील कोरोना वाढायला मदत केली आहे ती एपीएमसी मार्केटमधील गर्दीने. एपीएमसी मधील सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडताना दिसत आहे. सरकारने वारंवार आवाहन करूनही बहुतांश लोक हे तोंडाला मास्क लावत नाहीत. जर असं चालू राहीलं तर काही दिवसातंच एपीएमसी मार्केट कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखला जाईल.

सध्या नवी मुंबईत 54 हजार 206 पॉझिटिव्ह रुग्ण, 1 हजार 102 मृत्यू तर 52 हजार 107 रुग्ण बरे झाले आहेत. येत्या काही दिवसांत पाचही बाजारपेठेत नो मास्क नो एण्ट्री सुरू केले जाणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तिंवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दिली.

दरम्यान, कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. त्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करणे हेच आपल्याला पुन्हा लॉकडाऊनमध्ये जाण्यापासून थांबवू शकते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments