आपलं शहर

Mumbai Corona Update : मुंबईतील करोना परिस्थिती हाताबाहेर? धक्कादायक आकडेवारी

गेले काही महिने मुंबईतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याचे पाहायला मिळत होते. मात्र पुन्हा एकदा मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेने कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन केले आहे.

संपूर्ण शहरात आरोग्यविषयक कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. मुंबईमध्ये सध्या 8 हजार 799 बेड उपलब्ध आहेत.

मुंबईत कोरोना वाढतोय..

सध्या मुंबईतील बोरिवली, मुलुंड, चेंबूर आणि टिळक नगर या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही चार ठिकाणं पुन्हा हॉटस्पॉट होण्याच्या तयारीत आहेत.

मुंबईतील कंटेनमेंट झोन आणि सीलबंद इमारतींच्या संख्येतही पुन्हा वाढ होऊ लागली आहे. मुंबईमध्ये सध्या 93 कंटेनमेंट झोन आहेत. तर 1305 इमारती सील करण्यात आलेल्या आहेत.

मुंबईत आतापर्यंत 3117294 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 371 दिवस इतका आहे. तसेच मुंबईत सध्या 6900 एक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी ते वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता पुन्हा लॉकडाऊन करण्याची घोषणा करतील का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments