आपलं शहर

धक्कादायक, कोव्हॅक्सिन घेतल्यानंतरही दोन मुंबई पोलिसांना कोरोना…

कोरोनावर उपाय म्हणून राज्य आणि केंद्र सरकारकडून कोव्हॅक्सिन लस देण्याचा संकल्प करण्यात आला मात्र आता कोव्हॅक्सिन दिल्यानंतरही काहींना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं चित्र उघड झालं आहे. (Two constables contracted coronavirus after taking the covacin)

आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह पोलिसांनादेखील कोरोनाची देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या लढाईत फ्रंटलाईन काम करणाऱ्यांना सर्वात आधी कोरोना लस देण्याचं नियोजन केंद्र सरकारने बनवलं आहे.

कोरोना लसीकरण सुरु असताना त्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातील दोघाजणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. लसीकरणानंतर दोघांची कोरोना चाचणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आलाय.

घाटकोपर पोलीस ठाण्याचील 2 कॉन्स्टेबलनी राजावाडी रुग्णालयात करोनाची लस घेतली होती. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी त्यांच्या शरिरात कोरोनाची काही गुणधर्म दिसू लागल्याने त्यांच्या पुन्हा चाचण्या करण्यात आल्या, या चाचणीचे अहवाल
पॉझिटिव्ह आल्यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु केल्यानंतर ही वाढ सुरु झाली असल्याची माहिती आहे. (Two policemen infected with corona)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments