खूप काही

अरे देवा, OLX वर थेट मुख्यमंत्र्यांच्या मुलीची फसवणूक…

सध्या देशात ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांच्या मुलीचीदेखील ऑनलाइन फसवणूक झाल्याचे उगड झाले आहे. (Delhi Chief Minister Arvind Kejriwal’s daughter cheated on olx)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मुलगी हर्षिता (Harshita Kejriwal) हिची एका व्यक्तीने तब्बल 34 हजारांची फसवणूक केली आहे. ई-कॉमर्स म्हणून उदयास आलेल्या OLX वर हर्षिताने सोफा विकायची माहिती दिली होती, मात्र एका खरेदीदाराने हर्षिताला फसवल्याचं उघड झाले आहे.

हर्षिताने सोफा विकायची माहिती olx वर दिल्यानंतर एका व्यक्तीने हर्षिताशी संपर्क केला. सुरुवातीला छोटी रक्कम हर्षिताच्या अकाउंटमध्ये पाठवलीदेखील. मात्र मोठी रक्कम पाठवण्यासाठी संबधीत व्यक्तीने एक क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. हर्षिताने तो क्यूआरकोड स्कॅन केल्यानंतर लगेचच 20 हजार रुपये हर्षिताच्या अकाउंटमधून कट झाले.

हर्षिताने याबद्दल संबधीत व्यक्तीला सांगितले असता, ही प्रोसेस चुकून झाल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीने एक क्यूआर कोड पाठवा, हा स्कॅन केल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील, असंदेखील तो म्हणाला, मात्र तसं न होता उलट पुन्हा एकदा हर्षिताच्या अकाउंटमधून आणखी 14 हजार रुपये कट झाले.

संबधीत गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवला गेला आहे, तर पोलिसांनीदेखील अशा ऑनलाइन, ईकॉमर्स साईटवर नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकारामुळे olx च्या माहितीवर आता संशय निर्माण केला जात आहे, त्यामुळे तुम्ही जरी अशी कोणती गोष्ट, खरेदी किंवा विकत घेत असाल, तर सावधानी बाळगलेली बरी! (Delhi Chief Minister Arvind Kejriwal’s daughter cheated on olx)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments