कारण

लाल किल्ल्यावर राडा करणारा अभिनेता अटकेत, मोठे गुन्हे केले दाखल

कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची विराट ट्रॅक्टर रॅली दिल्लीत काढण्यात आली होती. लाल किल्यावर पोहचल्यानंतर संतप्त झालेला जमाव हा लाल किल्यात घुसला होता.

२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ‘ट्रॅक्टर रॅली’ दरम्यान घडलेल्या लाल किल्ला हिंसाचार घटनेतील मुख्य आरोपी पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धू याला तब्बल 14 दिवसांनंतर अखेर अटक करण्यात आली आहे.

फरार झाल्यानंतर सिद्धू सोशल मीडियाद्वारे आपले व्हिडिओ पोस्ट करत होता. आपल्या एका जवळच्या मित्राच्या मदतीनं तो हे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या व्हिडिओंद्वारे आपण निर्दोष असल्याचा दावा सिद्धू करत होता. दीप सिद्धूला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या अनेक टीम्स पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शोध घेत होत्या.

हिंसाचार प्रकरणात आत्तापर्यंत १२७ जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी, याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हरप्रीत सिंह (३२ वर्ष), हरजीत सिंह (४८ वर्ष), धर्मेंद्र सिंह (५५ वर्ष) या लोकांनाही अटक केलीय. सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेजद्वारे पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

(Delhi Police have arrested Deep Sidhu, an accused in 26th January violence case)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments