कारण

विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध होणार? देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्याचदरम्यान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लगेचच काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा सस्पेंस सपला आहे. मात्र हा सस्पेंस जरी संपला असला तरी विधानसभा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. याच मुद्यावर बोलत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संकेत दिले आहेत.

विधानसभा अध्यक्षपदाची निवड ही एकमताने करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे, असे म्हणत फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक बिनविरोध होईल असे संकेत दिले आहेत.

दरम्यान, येत्या 1 मार्चपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनातच नवीन अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते, तेव्हा त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत दिले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments