कारण

मुद्दा तापला, एकाच मुद्द्यावरुन शिवसेना-काँग्रेस यांच्यात जुंपली

मुंबई पालिकेच्या अंतर्गत येणारी अनेक प्राधिकरणे एकत्र करावीत अशी मागणी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिली, या मुद्द्याला पालिकेतील शिवसेनेचाही पाठिंबा आहे, मात्र मुंबई पालिकेत (Brihanmumbai Municipal Corporation) विरुद्ध पक्ष असलेल्या काँग्रेसचा या प्रस्तावाला विरोध आहे. (Dispute between Shiv Sena and Congress)

म्हाडा, एमएमआरडीए, एमआयडीसी, एसआरए, बीपीटी अशी अनेक प्राधिकरणे मुंबईत आहेत. मात्र ती प्राधिकरणे एका छताखाली यावीत अशी आयुक्तांची मागणी आहे. तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठण्यात येणार आहे.

मुंबईत असलेल्या अनेक प्राधिकरणांना स्वतंत्र अधिकार आहेत. जर ही सर्व प्राधिकरणे एकत्र केल्यास सर्व नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यास आणि विकासाची कामे वेगवाने करण्यास मदत होईल, अशी माहिती चहल यांनी दिली आहे, मात्र ही सर्व प्राधिकरणे पालिकेच्या मार्फत आपल्याकडे ठेवायची आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

मुंबईत विकासकामे करण्यासाठी 16 प्लानिंग एजन्सी काम करत असते. एक काम करण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. त्यामुळे जर एकच एजन्सी असली तर काम करण्यास सोप्प होईल, असा युक्तीवाद पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे.

पालिका आता सर्व प्राधिकरणे एकत्र करु पाहते, मात्र मुंबईत तयार झालेली प्राधिकरणे वेगवेगळी उद्दिष्ट्ये ठेऊन निर्माण झाली आहेत, त्यामुळे सर्व प्राधिकरणे एकत्र करणे योग्य नाही, असं मत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments