खूप काही

Weather change sickness: बदलत्या हवामानातील या 5 चुकांकडे लक्ष द्या, नाहीतर पडाल आजारी …

या हवामानात बरेच बदल होत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी थंडी आणि दिवसात उष्णता जाणवते. उन्हाळा पूर्ण होईपर्यंत हवामानातील बदल हे असेच सुरू राहतील. या बदलत्या हंगामात अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण थोड्याशा निष्काळजी पणामुळे आपण आजारी पडू शकतो. तर यावर कोणत्या मुख्य बाबतिकडे लक्ष दिले पाहिजे हे आपण बघुया

कपड्यांकडे लक्ष द्या – सकाळ आणि संध्याकाळ ची थंडी आहे तोवर अर्ध्या बाहीचे कपडे घालू नहे. सध्या हवामान इतके गरम नाही की आपण उन्हाळ्याचे कपडे घालायला सुरावत करू.या हंगामात जड कपडे घालू नका तर पूर्ण- हातचे कपडे घाला, ज्यामुळे बदलत्या हवामानात आजारी पडणार नाही. पूर्ण स्लीव्हड कपडे आपल्याला टॅनिंगपासून देखील वाचवतात.

अन्नाकडे लक्ष द्या– हिवाळ्याच्या वातावरणात गरम अन्न खायला -प्यायला चांगले आहे, याउलट उन्हाळ्यात लोकांना थंड गोष्टी खायला आवडतात. अन्नातील हे बदल अजिबात करु नका. फक्त थंड पाणी पिल्याणे किंवा खूप थंड गोष्टी खाल्याणे आपला घसा खराब होतो किंवा सर्दी होऊ शकते. अशा वेळी तळलेल्या आणि भाजलेल्या गोष्टी देखील हानी पोहोचवू शकतात.

Ac पासून रहा दूर : या हवामानात हिटर किंवा ब्लोअरचा वापर करणे सर्वांनी थांबवला आहे . सौम्य थंडीचा आणि गरम हवामानाचा आनंद घेतला पाहिजे. दुपारीसुद्धा जर उष्णता जास्त असेल तरीही एसी चालवू नका. यावेळी एसीची थंडी आपल्याला आजारी पाडू शकते. त्याऐवजी घराच्या खिडक्या व दारापासून ताजी हवा घ्या.

उन्हामध्ये फिरणे – दुपारच्या ऊनात आपण बाहेर जास्त वेळ फिरलो तर आजारी पडण्याची शक्यता असते.यावेळी शरीर हवामानाशी जुळवून घेत नाही आणि जोरदार सूर्यप्रकाशामुळे ताप येतो. या हंगामात जास्त उन्हात फिरणे टाळा.

वृद्ध आणि मुलांची काळजी घ्या– या हवामानाचा सर्वात मोठा परिणाम वृद्ध आणि मुलांवर होतो . यावेळी त्यांना आइस्क्रीम, कोल्ड्रिंक आणि दहीपासून दूर ठेवा. सकाळी आणि संध्याकाळी हलके गरम कपडे घाला आणि खूप थंड पाण्याने आंघोळ करू नका.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments