आपलं शहर

बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी स्वप्नातली घरं; म्हाडाची लॉटरी उद्या होणार जाहीर

म्हाडाची मुंबईची लॉटरी उद्या दुपारी (10 फेब्रुवारीला) जाहीर होणार आहे. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी ही लॉटरी सोडत आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली.

उद्या मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील ३०० घरांची लॉटरी निघणार आहे दुपारी १२.३० वाजता ही लॉटरी जाहीर करण्यात येईल.

विरार येथील पोलीसांच्या घराची लॉटरी आज काढण्यात आली. कोणी शिरढोण इथे घराचीही लॉटरी काढणार आहोत. ज्या पोलीसांना घरं हवी आहेत त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा. पोलीस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना घरं उपलब्ध करून देणार, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं

कोळीवाड्यात SRA योजना नाही
कोळीवाडे हे गावठाणे आहेत. गरजेनुसार पूर्व परंपरेने ही घरं बांधली आहेत. जरी ही बैठी घरं असली तरी तिथे SRA योजना लागू होणार नाही. कोळीवाड्यांना FSI देऊन त्यांचा विकास व्हावा असा प्रयत्न आहे. अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

(Dream houses for the residents of BDD Chawl; MHADA lottery will be announced tomorrow)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments