फेमसखूप काही

Elon Musk चा ट्विटरला रामराम..

जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ति Elon Musk चं फक्त एक ट्वीट शेअर बाजारात खळबळ माजवण्यासाठी पुरेसं आहे. सध्या त्यांच्या ट्वीटमुळे अनेक कंपनींच्या शेअरच्या किंमतींमध्ये जबरदस्त तेजी आली आहे.

मस्क नेहमीच ट्विटरवर ॲक्टीव्ह असतात, आणि ट्विटद्वारे ते आपलं म्हणणं जगासमोर वेळोवेळी मांडत असतात. त्यांना ट्विटरवर करोडो लोक फॉलो करतात. पण आता मस्कने काही काळाकरिता ट्विटरवरून ब्रेक घ्यायचं ठरवलंय.

इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला (Tesla) आणि स्पेसएक्स (SpaceX) चे सर्वेसर्वा इलॉन मस्कने मागील महिन्यात ऍमेझॉनच्या जेफ बेजॉस यांना मागे सारत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ति झाले. मस्क यांनी स्वत: ट्विटरवरून विश्रांती घेत असल्याचे एका ट्विटद्वारे कळवले आहे.

‘Off Twitter for a While’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. मात्र त्यांनी आपण ट्विटर का सोडून जातोय याबद्दल काही माहिती दिली नाही. त्यांचे सध्या ट्विटरवर 44.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.

एका ट्विटने बदलले अनेक कंपनींचे नशीब
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला आणि पेशाने इंजिनियर असणार्या मस्कने मागच्या आठवड्यात गेम्स कंपनी Gamestop च्या समर्थनार्थ एक ट्विट केलं होतं. मग काय, त्या कंपनीच्या शेअरमध्ये 680 टक्के जास्त उसळी आली. या ट्विटच्या आधी ही कंपनी आपलं अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करत होती. मागच्याच शुक्रवारी त्यांनी आपले ट्विटर प्रोफाईल बदलून #bitcoin काय लिहिलं, या क्रिप्टोकरंसीची किंमत जवळपास 20 टक्क्यांनी वाढली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments