खूप काही

IND vs ENG: अँडरसन, बटलर सहित दोघांचा दुसऱ्या कसोटीतून पत्ता कट

चेन्नई येथे भारताविरुद्ध खेळल्या जाणार्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने (England) आपला संघ जाहिर केला आहे. जो रूटच्या नेतृत्वात असलेल्या इंग्लंड संघात या सामन्यासाठी काही मोठे बदल करण्यात आले आहेत. जेम्स अँडरसन (James Anderson), डॉम बेस (Dom Bess), जॉस बटलर (Jos Buttler) आणि जोफरा आर्चर (Jofra Archer) यांच्याजागी आता मोईन अली (Moeen Ali), स्टूअर्ट ब्रॉड (Stuart Broad), क्रिस वोक्स (Chris Woakes), बेन फोक्स (Ben Foakes) आणि ऑली स्टोन (Olly Stone) या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, जॉस बटलरच्या जागी आलेला विकेटकिपर-बॅटस्मन बेन फोक्स हा 2019 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळलेल्या सामन्यानंतर पहिल्यांदा या सामन्यामध्ये खेळणार आहे. तसेच, जोफरा आर्चरला दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी टिम इंग्लंड:
जो रूट, रॉरी बर्न्स, डॉम सिबली, डॅनियल लॉरेन्स, बेन स्टोक्स, ऑली पोप, मोईन अली, जॅक लीच, स्टूअर्ट ब्रॉड, क्रिस वोक्स, बेन फोक्स आणि ऑली स्टोन.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments