खूप काही

10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा, लवकर हे काम करून घ्या…

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले काही महिने सगळेच ठप्प होते. त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राचे देखील गणित बिघडले होते. महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळापत्रक आणि परीक्षांवर याचा परिणाम झाला. अशातच आता 10वी आणि 12वी लेखी परीक्षेत खासगीरित्या परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल महिन्यातील 10वी आणि 12वीच्या लेखी परिक्षेला खासगीरित्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदत वाढवून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

या निर्णयाप्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी 22 ते 28 फेब्रुवारी या काळात www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. 1 ते 7 मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना विलंब शुल्क भरून नोंदणी करता येणार आहे. तसेच 7 मार्चनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही असे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी आपला अर्ज शाळा, ज्युनियर कॉलेज यांच्यामार्फत भरावा अशी सुचना करण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments