खूप काही

रिअल इस्टेटचा बाप माणूस, ईडीच्या कचाट्यात… तब्बल इतके तास चौकशी…

हल्ली ईडीच्या चौकशीच सत्र सर्व क्षेत्रात जोर घेताना दिसत आहे. सेलिब्रिटी पासून नेते मंडळींपर्यंत काही ना काही कारणाने बड्या लोकांची ईडीकडून चौकशी होताना दिसत आहे. अलीकडेच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या राहत्या घरी आणि कार्यालयावर ईडीने छापा घातल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. (famous contractor from Pune summon by ED.)

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची दहा तास चौकशी करण्यात आली आहे. FEMA कायद्या अंतर्गत ही चौकशी करण्यात आली आहे. ईडीने सकाळी अविनाश भोसले यांना मुंबईत बोलवून घेतले. त्यानुसार भोसले सकाळी १० वाजता ईडीच्या कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांची पुढील १० तास चौकशी करण्यात आली. तसेच त्यांच्याकडील काही कागदपत्रांची पडताळणी सुद्धा ईडीद्वारे करण्यात आली.

काल पुण्यात ईडीकडून काही ठिकाणी छापे मारण्यात आले. या प्रकरणाचा भोसले यांच्याशी काही संबंध आहे का ? याचे उत्तर अजूनही स्पष्ट झाले नाही. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबई येथिल २३ ठिकाणांवर आयकर विभागाने छापे मारले होते.

अविनाश भोसले आहेत तरी कोण ?
अविनाश भोसले हे नाव कंत्राटदार विश्वात आता नवा रूपास आले असले तरीही हा त्यांचा पिढीगत व्यवसाय नाही. सुमारे ८० च्या दशकात भोसले रिक्षा चालक होते. नंतर त्यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि त्यातूनच पुढे ते सरकारी कंत्राटदार बनले.
आज ते आज ते कोट्यवधी रुपयांचे एबीआयएल ग्रुप चे मालक आहेत. रिअल ईस्टेट किंग म्हणून आज भोसले पुण्यात प्रख्यात आहे.
पुण्याच्या बाणेर येथे भोसले यांचा आलिशान असा सफेद रंगाचा अमेरिकेच्या व्हाईट हौसे सारखा महाल आहे. त्याच नावही व्हाईट होऊस च ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments