कारण

Farmer Protest : दिल्लीच्या आंदोलनाचा पुढचा चाप्टर, शेतकऱ्यांची मोठी भूमिका…

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज (6 फेब्रुवारी) रोजी देशव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून सुरू असलेले आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत देशव्यापी चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. फक्त राष्ट्रीय व राज्य मार्ग जाम करण्याचे आवाहन भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय पवक्ते राकेश टिकेत यांनी केले आहे. तसेच जे शेतकरी दिल्लीला येऊ शकले नाही त्यांनी आपापल्या ठिकाणी आंदोलन करावे. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच खासगी वाहनांतून कोणी आजारी व्यक्ती जात असल्यास आशा वाहनांना रोखले जाणार नसल्याचे टिकेत यांनी सांगितले.

चक्काजाम आंदोलनाबाबत कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, दिल्ली , उत्तर प्रदेश, आणि हरियाणातील पोलीस सतर्क आहेत. दिल्लीसह उत्तर प्रदेश व उत्तराखंडचे शेतकरी सहभागी होणार नसल्याने या राज्यांत आंदोलन होणार नाही.

(Farmer Protest: The next chapter of the Delhi agitation, the big role of farmers …)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments