खूप काहीफेमस

शेतकरी आंदोलनामुळे पॉर्नस्टार ट्रेंडिंगमध्ये, नेमकी भानगड काय?

कृषी कायद्या विरोधातील आंदोलन गेल्या कित्येक दिवसांपासून  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. 

परंतु आज या वादाला एक वेगळेच रूप आले जेव्हा विदेशातील नामांकित व्यक्ती आणि पॉप सिंगर रिहाना सह पॉर्नस्टार मिया खलिफा ने देखील तिचा शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा आपल्या ट्विटर अकाउंट वरून दर्शवला.  

मिया एक प्रसिद्ध पॉर्नस्टार आहे. तिने आज तिच्या ट्विटर अकॉउंट वरून शेतकऱ्यांना पाठिंबा देणारी पोस्ट शेयर केली आहे. ज्यात मिया म्हणते, “ आंदोलना दरम्यान मानवाधिकार कायद्याचे उल्लंघन होत आहे, त्यांनी दिल्ली मधील इंटरनेट सुविधा ही बंद केल्या आहेत.” 

मिया च्या आणखी एका ट्विट मध्ये तिने  म्हटलं आहे की, पेड अक्टर्स … मला खात्री आहे कि पुरस्कार सोहळ्याला त्यांना दुर्लक्षित केले जाणार नाही. मी शेतकऱ्यांसोबत आहे असे देखील मिया ने लिहिले आहे.

अमांडा केर्णी ने सुद्धा आपल्या सोशल मीडिया वर फोटो पोस्ट करून खाली कॅपशन मध्ये “जग बघत आहे. या मुद्द्याला समजून घेण्यासाठी तुम्हाला भारतीय किंवा पंजाबी किंवा दक्षिण एशियाई होण्याची गरज नाही आहे. आपण  फक्त मानवतेची काळजी केली पाहिजे. श्रमिकांसाठी नेहमी बोलण्याचे स्वातंत्र्य, प्रेस चे स्वातंत्र्य सामान मानवी आणि नागरी अधिकार तसेच प्रतिष्ठा यांची मागणी केली पाहिजे. 

 

याआधी पॉप स्टार रिहाना ने सुद्धा आपल्या ट्विटर अकाउंट वरून आपण या गोष्टी बदल का बोलत नाही? असा प्रश्न केला होता. यावर बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत ने , “ यावर कोणीच काही बोलत कारण हे शेतकरी नसून आतंकवादी आहेत जे भरताला तोडू इच्छितात ज्यामुळे चीन सारखा देश आमच्या देशावर कब्जा करेल आणि यूएस सारखी चायनीज कॉलोनी बनवेल. तू शांत राहा. आम्ही तुझ्या सारखे मूर्ख नाही आहोत.” असे प्रतिउत्तर दिले.   

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments