कारणआपलं शहर

फास्टॅग बद्दल जानुन घ्या…काय आहे फास्टॅग? कोणा कोणासाठी अनिवार्य?

मुंबई – केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना फास्टॅग अनिवार्य केले आहे. याची अंमलबजावणी 15 फेब्रुवारी पासून केली जाणार आहे. फास्टॅग म्हणजे नक्की काय? कोणत्या गाड्यांना हवा? कसा बनवायचा? याबद्दल माहित करून घेऊ.

फास्टॅग म्हणजे काय ?

वाहनाच्या खिडकीला लावलेल्या स्टिकरला फास्टॅग म्हणतात.याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते नाक्यावरील स्कॅनला कनेक्ट करत. त्यामुळे तुमच्या अकाऊंट मधील पैसे कापले जातात. अशा वेळी तुमच्या गाडीला फास्टॅग लावलेला असेल तर कोणत्याही विलंबाशिवाय तुम्ही टोलनाक्यावरून निघून जाऊ शकता.हे फास्टॅग वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्डला जोडलं जाऊ शकतं. त्यामुळे जिथे टोल भरण्याची गरज आहे, त्या टोल नाक्यावर तुमच्या अकाऊंटमधून आपोआप पैसे कापले होतात.

फास्टॅग खरेदी कशी कराल?

जर गाडीची नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची असेल तर तुम्हाला फास्टॅग बसवावाच लागेल. पिवळ्या नंबरच्या प्लेटची गाडी असेल तर कॅब असूदे वा ट्रक फास्टॅग बसवावाच लागेल.फास्टॅग कोणत्याही टोल बूथवर खरेदी करता येते.खरेदीसाठी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंटसह आयडीची गरज असते. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीफसी बँक अश्या अनेक बँका मधून खरेदी करू शकतात.पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता

फास्टॅगची किंमत वाहन कोणत आहे यावर आणि कुठून फास्टॅग खरेदी करता यावरही अवलंबून आहे. इश्यू फी आणि सेक्युरिटी डिपॉजित फी बँकेवर अवलंबून असते

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments