कारण

Budget 2021 ची गाडी आरोग्य खात्याकडे रवाना, मिळाला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा निधी

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आज लोकसभेत बजेट सादर केले. यंदाचे बजेट अनेक अर्थाने ऐतिहासिक आहे. हे बजेट या दशकातील पहिले बजेट आहे, आणि तेही पूर्णपणे डिजिटल!

भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादे बजेट छापण्यात आले नाही आहे.तसं पाहिलं तर, दर बजेट वेळी अर्थमंत्रालयाच्या प्रेस मध्ये बजेट छापले जाते आणि नंतर त्याच्या प्रति सदस्यांना देण्यात येतात. यंदा मात्र करोना महामारीमुळे बजेट न छापता ते डिजिटल माध्यमातून “पेपरलेस बजेट” उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरवेळीप्रमाणे यंदाही बजेटचं भाषण खूपवेळ चाललं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. आज सादर झालेल्या बजेट मधील “आरोग्य आणि शिक्षण” क्षेत्रासाठी झालेल्या तरतुदी आणि या क्षेत्राशी निगडीत निर्णय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आरोग्य
बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रावर अधिक फोकस देण्यात आला आहे. आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. देशातील नागरिकांना निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने हे सर्व निर्णय घेतले गेले आहेत.

करोना महामारीमुळे देशातील आरोग्य क्षेत्रावर खूप ताण पडला. म्हणून या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रात अनेक नविन योजना आणि तरतूदी केल्या आहेत. या बजेटमध्ये आरोग्य विभागासाठी 69 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पंतप्रधान जनआरोग्य योजना:
“पंतप्रधान जनआरोग्य “ या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास 20 हजार हून अधिक रुग्णालये बांधली गेली आहेत. या रुग्णालयांमध्ये नवीन लसीकरण रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत आता देशभरात आणखी 11 हजार रुग्णालये बांधली जातील.

ही रुग्णालयं जिथे अजून एकही रुग्णालय बांधलं गेलं नाही, अशा ठिकाणी सुरू होणार आहेत. या योजनेमुळे तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे.

नवीन तपासणी केंद्र:
देशभरात नवीन तपासणी केंद्र उभारली जाणार आहेत. विषाणू परिक्षणासाठी उच्च दर्जाचं तपासणी केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच, 4 उच्च दर्जाचे आंतरराष्ट्रीय तपासणी केंद्र देखील उभारली जाणार आहेत.

या बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रात 137 पेक्षा अधिक तरतूदी केल्या आहेत. वर्ष 2021-22 या वर्षात आरोग्य क्षेत्रासाठी जवळपास 2.46 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. देशातून टीबी रोगाला हद्दपार करण्यासाठी सरकारने “टीबी हारेगा, देश जीतेगा” मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे टीबीला पुढच्या पाच वर्षात भारतातून कायमचं हद्दपार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.

शिक्षण क्षेत्र
शिक्षण क्षेत्रात देखील अनेक चांगल्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये, 100 नवीन सैनिक स्कूल सुरू करण्यात येणार आहेत. तसेच लेह मध्ये एक सेंट्रल युनिवर्सिटी (केंद्रीय विद्यापीठ) उभारण्यात येणार आहे.

आदिवासी समाजासाठी देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय या बजेटमध्ये आहे. तो असा की, आदिवासी भागांमध्ये “एकलव्य स्कूल” सुरू केल्या जाणार आहेत. यामध्ये जवळपास 758 एकलव्य स्कूल उभारण्यात येतील.

तसेच, अनुसूचित जातीतील 4 कोटी विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशीप दिली जाणार आहे. यासाठी 35 हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.

यावेळी सरकारतर्फे लवकरच हायर एजूकेशन कमीशन (Higher Education Commission) स्थापन करण्यात येणार असल्याचं देखील बजेटमध्ये सांगितलं गेलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments