खूप काही

शारजील उस्मानीच्या वादग्रस्त भाषणाचे परिणाम, पुणे पोलीस ठाण्यात FIR दाखल.

शारजील उस्मानी ने 30 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या एल्गार परिषदेत हिंदूं विरोधात वादग्रस्त विधाने केली, आणि काहीच वेळात ह्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया वर तुफान व्हायरल झाला. परिणामी अनेक लोकांनी ह्या घटनेवर आपला आक्षेप दर्शवून शारजील ला अटक करण्याची मागणी केली. 

पुण्याचे पोलीस कमिशनर अमिताभ गुप्ता यांनी शारजील वर IPC  सेकशन153 (A) अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. प्रदीप गावडे ह्या भाजपा च्या कार्यकर्त्याने स्वारगेट पोलीस ठाण्यात उस्मानी विरोधात तक्रार दाखल केली होती.

 भाजपा  नेते देवेंद्र फडणवीस यांनीही ह्या विषयावर आपले मत प्रसार माध्यमांकडे व्यत्क्त केले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘ एक  सडक्या विचारांचा माणूस महाराष्ट्रात येतो, हिंदूंचा अपमान करतो आणि कोणत्याही कारवाई शिवाय आपल्या राज्यात पुन्हा निघून जातो. जर  राज्यसरकार कोणत्याही प्रकारची कारवाई  करत नसेल, तर या घटनेमागे राज्यसरकार आहे, असे आम्ही समजू, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments