कारण

‘हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही’ मनसेचा शिवसेनेला दणका

हल्ली शिवसेनेत अनेक भाजप नेते प्रवेश करताना दिसत आहेत. भाजपची नेते मंडळी आणि भाजपची मत आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेना वेगळीच खेळी खेळात असल्याचे दिसत आहेत.’ उद्धव ठाकरे आपडा’ पासून ते ‘रासगरबा’ पर्यंत सर्व युक्त्या लढवून शिवसेनेने ‘मला जे हवं ते मी मिळवतोच कधी ही कुठे ही आणि कास ही’ हे वाक्य खर करून दाखवलं. 

आता भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिव बंधन बांधून घेऊन शिवसेनेत प्रवास केला. परंतु त्यांच्या स्वागता साठी जेव्हा गुजराती मधून पोस्टर लावण्यात आले तेव्हा मनसेने या पोस्टर्सवर हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही अशी पत्रक लावून शिवसेनेच्या या कार्याला विरोध दर्शवला. 

शिवसेना-मनसे वाद पुन्हा सुरु झाल्याचं दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या निवडुका जवळ येताना दिसताच सर्व भाषिकांची मत घ्यायच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला मनसेने हा महाराष्ट्र असल्याची आठवण करून दिली आहे. 

या गोष्टीचे राजकारणातील खेळात होणारे परिणाम पाहून फारच उत्सुकीच राहणार आहे.   

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments