कारण

देशाच्या इतिहासात पहिल्यांदा नटसम्राट पंतप्रधान पाहिला – भाई जगताप

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज ऑगस्ट क्रांती मैदानात पदग्रहन सोहळा पार पडला. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा नटसम्राट पाहिला, असा घणाघात भाई जगताप यांनी मोदींवर केला. हिटलरपेक्षा जास्त प्रमाणात सत्तेचा माज असलेला पहिला पंतप्रधान देशाने पाहीला. तो म्हणजे नरेंद्र मोदी. त्यामुळे काँग्रेसने मोदी चले जाव असा नारा दिला आहे, असं भाई जगताप म्हणाले.

देशाची संसद एक वर्षानंतर सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा होती की सिंघु बॉर्डरवर गेल्या दोन महिन्यात २०० हुन अधिक शेतकरी शाहिद झाले. त्यांचा उल्लेख करतील असं वाटलं होतं. परंतु एकही शब्द काढला नाही, असं भाई जगताप म्हणाले. देशाच्या इतिहासात नटसम्राट असलेले पंतप्रधान आपण पाहतोय. नाटक करण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेले नरेंद्र मोदी आपण पाहतोय. आमचे नेते आझाद साहेबांना निरोप देताना तीन वेळा पाणी प्यायले, अश्रू काढले. याला नारकाश्रु म्हणतात.
याला मगरीचे अश्रू म्हणतात. कारण अडवाणींच्या वेळी आशा प्रकारचे अश्रू काढलेले आपण पाहिले नाहीत. अशा प्रकारचे अश्रू मुरली मनोहर यांच्या वेळेस काढलेले आठवत नाहीत, असा टोला देखील जगताप यांनी लगावला. देशाच्या लोकशाहीने निवडून आलेले परंतु हिटलरपेक्षा जास्त प्रमाणात सत्तेचा माज असलेला पहिला पंतप्रधान पहिला, तो म्हणजे नरेंद्र मोदी. यामुळे कॉंग्रेसने मोदी चले जाव असा नारा दिला आहे, असं भाई जगताप यांनी सांगितलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments