घटना

आधी मॉडेलिंग, नंतर फसवणुकीने पॉर्न क्षेत्रात एन्ट्री, तरुणीकडून धक्कादायक खुलासा

चंदेरी दुनिया समजली जाणाऱ्या मुंबईमध्ये अनेकजण स्टार आणि सुपरस्टार होतात, मात्र अशा रंगीन दुनियेत आपलं करिअर घडवण्यासाठी आलेल्या अनेक जणांचं न कळत आयुष्य उध्वस्त होत असत.असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत आलेल्या एका तरूणीसोबत घडला आहे. (First modeling, then fraudulent entry into the porn field, shocking revelation from a young woman)

मुंबई क्राईम ब्रांचने मुंबईत चालणार्या, पॉर्न फिल्म बनवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय, या प्रकरणाला एका तरुणीने समोर आणल्यामुळे मुंबईत चालणारे काळे धंदे उघड झाले आहेत.

मुंबईसह अनेक शहरांमध्ये मॉडेलिंग करणाऱ्या एका तरुणीला वेब सीरिज बनवण्याच्या उद्देशाने एक फोन आला. कोणताही वाईट विचार मनात न आणता या कॉन्ट्रॅक्टसाठी तरुणीने होकार दिला. ज्या वेब सीरिजमध्ये संबंधित तरुणी काम करणार होती, त्याबद्दल तिला कुठलीच माहिती दिली नव्हती. सुरुवातीला तरुणीला मुंबईत बोलवलं गेलं, त्यानंतर घाईगडबडीत तिच्याकडून एका पेपरवर सही करून घेण्यात आली.

ज्यावेळेस शूटिंगला सुरुवात झाली, त्यावेळेस नॉर्मल शूट करण्यात आलं, मात्र काही दिवसात तुला न्यूड शूट करावं लागणार असल्याचं सांगण्यात आलं. या गोष्टीला तरुणीने विरोध करूनही एका शीतपेयातून तिला गुंगीचे औषध पाजण्यात आलं आणि तिच्यासोबत न्यूड सिन शूट करण्यात आला. तिला जाग आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

अनेक विनंती करूनही संबंधित टीमने हा व्हिडीओ डिलिट करण्यास नकार दिला. अखेर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीने पोलिसांमध्ये धाव घेतली. (First modeling, then fraudulent entry into the porn field)

वकील राजा नलावडे यांची मदत…
संबंधित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी राजा नलावडे मदत करत आहेत. अशा रॅकेटमध्ये मुंबईसह अनेक मुली फसल्या असल्याची माहिती नलावडे यांनी दिली आहे. त्यासोबतच मुंबईतल्या अशा रॅकेटचा लवकर पर्दाफाश करावा लागेल, नाहीतर अनेक तरुणींचे आयुष्य अशा रॅकेटमुळे बरबाद होऊ शकते, असं मत वकील राजा नलावडे यांनी व्यक्त केलं आहे.

अभिनेत्री अटकेत…
एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीचा हात या सगळ्यात असल्याचं म्हटलं जातंय, येत्या काही दिवसात त्याची चौकशी होणार असल्याचे म्हटले जातंय. या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठसह उमेश कामत या हाय प्रोफाइल व्यक्तीला अटक केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments