कारण

या तारखेपासून ज्येष्ठ नागरिकांनाही मिळणार मोफत कोरोना लस..

गेले काही महिने भारतामध्ये कोरोना लसीकरणाची मोहिम सरकारने हाती घेतली आहे. यामध्ये सर्वात आधी कोरोना वॉरियर्सना ही लस देण्यात आली होती. आता देशभरात 1 मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

“देशभरात 1 मार्चपासून 60 पेक्षा अधिक वय असणारे नागरीक आणि इतर व्याधी असलेल्या 45 पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे,” असं जावडेकर यांनी सांगितले.

देशभरात तब्बल 30 हजार लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. ज्यामध्ये 10 हजार सरकारी तर 20 हजार खासगी लसीकरण केंद्र असरणार आहेत. त्याप्रमाणे, ज्येष्ठ नागरिकांना ही लस मोफत देण्यात येणार असून याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे.

दरम्यान, ज्यांना खासगी रुग्णालयात लसीकरण करायचे आहे अशांना पैसे भरावे लागणार आहेत, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments