कारण

Budget 2021 : अर्थमंत्र्यांच्या साडीपासून भाषणातल्या कवितेपर्यंत, पश्चिम बंगाल पे निशाणा…

बहुचर्चित केंद्रीय अर्थसंकल्प आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलं. जवळपास 1 तास 50 मिनिट अर्थसंकल्पिय भाषणात अनेक छोट्या मोठ्या घोषणांची खैरात त्यांनी केली, पण सर्वांचं लक्ष वेधले ते म्हणजे पश्चिम बंगालच्या घोषणांनी. (Budget 2021: From Finance Minister’s Saree to Early Poem, targate to West Bengal)

आजच्या बजेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, तर पश्चिम बंगाल. अनेक घोषणा पश्चिम बंगालला डोळ्यासमोर ठेवून झाल्या, असा टोला विरोधकांनी लगावलाय. केवळ घोषणाच नाही तर माननीय अर्थमंत्र्यांची साडीपासून योजनांपर्यंत सबकुछ बंगाल होतं, हे देखील सांगायला अनेकजण विसरले नाहीत.

त्यामुळे बजेट देशाचं, खैरात पश्चिम बंगालला वाटल्याचं चित्र आता समोर येत आहे. पश्चिम बंगालवर योजनांचा धो धो पाऊस पडलाच आजच्या बजेटमध्ये पाहायला मिळालं.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट मांडायला जी साडी नेसून आल्या, तीच मुळी पश्चिम बंगालला डोळ्यासमोर ठेवूनचं. अशी चर्चा सुरू झाली आहे. पांढऱ्या रंगाची आणि त्याला लाल काठ असलेली साडी पश्चिम बंगालमध्ये शुभ मानली जाते. लाल पाड साडी असं तिचं नाव आहे. दूर्गापूजेला आवर्जून ही साडी नेसली जाते. म्हणूनच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पांढऱ्या रंगाची, लाल काठाची हँडलूम पटोला साडी नेसली होती. लाल पाड साडीला बंगालच्या संस्कृतीत मोठं स्थान आहे. अर्थमंत्र्यांच्या साडीच्या या चॉईसची अर्थातच बंगालनं दखल घेतली असणार. अर्थमंत्र्यांनी बजेट मांडायला सुरुवात केली तीही रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितेने.

पश्चिम बंगालमधल्या हायवेंसाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. बंगालमध्ये 675 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. कोलकाता-सिलीगुडी मार्गाचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे

पश्चिम बंगालवर अशी खैरात करण्यात आलीय. एकीकडे पंतप्रधान मोदींचा रवींद्रनाथ टागोर लूक, दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची बंगाली संस्कृतीमधली साडी यालाच म्हणतात बजेट पे नजरे पश्चिम बंगालपे निशाणा.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments