फेमस

दिल्लीतला वेटर बनला चीनमध्ये फिल्मस्टार, एका स्टारची भन्नाट कहाणी

नवी दिल्ली: एका छोट्याश्या खेडेगावात,डोंगरदऱ्यात राहणारा मुलगा चीनला जाऊन सुपरस्टार होन हे कोणत्या चित्रपटाच्या कहाणी पेक्षा कमी नाही.देव रातूरी नावाच्या एका तरुणाने चीनच्या चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

देव हा चीनी सिनेसृश्टितील महत्वाचा चेहरा आहे. त्याने 2015 पासून 20 चीनी चित्रपट आणि वेब सिरीज मध्ये काम केल आहे.लियू ताओ, वू गँग, झांग जिन, ली झिटिंग आणि किओ झेंयू यांसारख्या लोकप्रिय चिनी कलाकारांसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे.

देव रातुरी हा उत्तराखंडच्या टिहरी गढवाल जिल्ह्यातील कॅमरसौड या भागातील रहिवाशी आहे. त्याने फक्त दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.शिक्षण झाल्यानंतर 1995 मध्ये देव हा रोजगारासाठी नवी दिल्लीत आला.त्याने तिथे वेटरची नोकरी केली, गाड्या पुसल्या. या ठिकाणी तो दरमहिना 400 रुपयाची नोकरी करायचा.

1998 मध्ये मुंबईत आल्यावर त्यांनी एका ॲक्टरचा ड्रायव्हर म्हणून त्याने नोकरी केली.2005 मध्ये त्याला चीनच्या शिआन शहरात वेटरची नोकरी मिळाली आणि तेव्हा त्याने चीनी भाषा शिकली.त्यानंतर 2013मध्ये त्याने जर्मन आणि अमेरिकन रेस्टॉरंट मध्येही काम केले.तेव्हा ट्याजा पगार लाखो रुपये होता.देवने चीनमध्ये बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे, एवढेच नव्हे तर देव यांना हॉलिवूड चित्रपट ‘आयरन स्काय’ मध्येही काम करण्याची संधी मिळाली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments