कारण

तुम्ही दोन नगरसेवक फोडले, आम्ही तुमच्या दुप्पटीने फोडू; शिवसेनेला थेट चॅलेंज

नवी मुंबईतल्या नेरुळ इथे भाजपचे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आलंय, याचं उद्घाटन करण्यासाठी भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (BJP leader and MLA Ganesh Naik) उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना नाईक यांनी शिवसेनेला थेट चॅलेंज दिल आहे. (We will take your double corporator in BJP, Ganesh Naik’s warning to Shiv Sena)

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने आता सगळ्याच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचे अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, प्रमुख नेते यांना फोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपचे नवी मुंबईतील कार्यशील नेते गणेश नाईक मैदानात उतरले आहेत.

शिवसेनेच्या गुंडांना घाबरण्याची काहीच गरज नाही, अर्ध्या रात्री जरी काही लफडे झाले तर मला फोन करा, मी तिथे हजर राहीन, इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय गुंडांना देखील गणेश नाईक माहीत आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही, असा थेट इशारा कार्यक्रमात बोलताना गणेश नाईकांनी शिवसेनेनला दिला आहे.

शिवसेनेसह राष्ट्रवादीने भाजपच्या अर्ध्याहून अधिक डझन नगरसेवकांना आपल्या पक्षात स्थान दिले आहे, त्यामुळे तुम्ही आमचे जितके नगरसेवक फोडला त्याच्या दुप्पटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू, असा इशारा नाईकांनी सेनेला दिला आहे.

गणेश नाईकांना सोडून तब्बल 14 नगरसेवक विरोधकांना जाऊन मिळाले आहेत, 1997 पासून अनेक नगरसेवकांनी गणेश नाईक यांची साथ सोडली आहे, तरी नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांनाचं निवडून दिलय, त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा त्यापेक्षा मोठी आघाडी असो, पालिकेत भाजपचा महापौर येईल, असं नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे, त्यामुळे येत्या काळात भाजप आपला बालेकिल्ला राखणार की नवा इतिहास घडणार, हे पाहणे गरजेचे आहे. (Ganesh Naik’s warning to Shiv Sena)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments