फेमस

Gangubai Kathiawadi teaser 2021: “कुवारी आपण सोडल नाही, श्रीमती कोणी बनवल नाही” आलिया भट्टचा दमदार किरदार

अभिनेत्री आलिया भट्टचा आगामी सिनेमा गंगुबाई काठियावाडीचा टीझर आज लाँच झाला. टीझर मध्ये आलिया भट्टचा दमदार आणि अनोखा अंदाज बघायला मिळत आहे. चित्रपटासाठी आलिया भट्टने तिच्या हावभावांवर, आवाजावर खूप मेहनत घेतली आहे हे दिसून येत आहे. टिझर काही वेळातच सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आणि लोकांनी भरभरून आलियाची तारीफ केली आहे.

1 मिनिट 31 सेकंदच्या या टीझरमध्ये आलिया भट्ट पूर्णपणे चमकली आहे. आलियाची एन्ट्री पण एकदम धमाकेदार आहे.”गंगू चांद थी और चांद ही रहेगी” या दमदार डायलॉग ने तिची एन्ट्री आहे.गंगुबाईच्या रोल मध्ये जो राग, हिम्मत, ताकत, निडरता पाहिजे ती तिच्यात दिसत आहे. अलियाचा लूक पण एकदम वेगळा आहे.कपाळावर मोठी लाल टिकली, डोळे भरून काजळ, फुलांनी भरलेले केस अश्या लूक मध्ये आलिया एकदम सुंदर दिसत आहे.

संजय लीला भन्साळी दिग्दर्शीत हा चित्रपट “द माफिया क्वीन ऑफ मुंबई” या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटासाठी मोठे मोठे सुंदर सेट उभे केले आहेत. चित्रपटामध्ये आलियाचे 2 डान्स नंबर ही असणार आहेत आणि अजय देवगन ही चित्रपटाचा भाग आहे. 30 जुलै 2021ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments