खूप काही

पळा, पळा… उत्तराखंडाच्या घटनेवर देश हादरला, हिमकडा कोसळला आणि….

उत्तराखंडच्या चमोली येथे एक हिमकडा (Glacier) कोसळला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हिमकडा कोसळल्यामुळे अलकनंदा आणि धौली गंगा या नद्यांना पूर आला असल्याची माहिती आहे. ही संपूर्ण परिस्थिती पाहता, किर्ती नगर, देवप्रयाग, मुनि की रेती या परिसरांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. नद्यांना पूर आल्या कारणाने तेथील घरेदेखील वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जवळपासच्या सर्व परिसरांना खाली करण्याचे काम सध्या सुरू आहे. नागरीकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

तपोवन ऋषी गंगा ग्लेशियर तूटल्यानंतर पाण्याची पातळी वाढतेच आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून श्रीनगर गढवाल धारी देवी मंदिराचा परिसर पोलिसांनी खाली करण्यास सुरूवात केली आहे. तसेच हरिद्वार पर्यंत प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे जोशीमठच्या रेणी गावात असलेल्या ऋषीगंगा वीज प्रकल्पाला मोठं नुकसान झाले आहे. हा वीज प्रकल्प वाहून गेला असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या घटनेची दखल घेत जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि इतर यंत्रणांना यांना या घटनेशी सामना करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.

ग्लेशियर कोसळल्यामुळे खूप घरांचे नुकसान आणि काही नागरिकांचे प्राण जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उत्तराखंड सरकारने नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. मुख्यमंत्री रावत यांनी ट्विट करत आवाहन केले की, “जर तुम्ही प्रभावित क्षेत्रात अडकला असाल, तुम्हाला कोणत्याही परिस्थितीची मदत पाहिजे असल्यास दिलेल्या नंबरला संपर्क करा. कृपया घटनेविषयीच्या जुन्या क्लिप्सद्वारे अफवा पसरवू नये.”

हेल्पलाईन नंबर
1070 आणि 9557444486

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments