खूप काही

Uttarakhand: बहिणीची करुणामय हाक, बोगद्यात बंद झालेला भावाचा प्रतिसाद

NCPT च्या तपोवन-विष्णुगढ़ हायड्रो पॉवर प्रोजेक्ट चा प्रोजेक्ट 1900 मीटर लांब आहे. आणि या बोगद्यात 35 लोक अडकल्याची अंदाज वर्तवण्यात आला आहे. (glacier collapse at uttarakhand)

उत्तराखंड च्या तपोवनचा बोगदा हिमखडा पडल्याने पूर्णपणे बंद झाला आहे. बोगद्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी कसोटीचे प्रयत्न चालू झाले आहेत. याच सर्व घडामोडी होत असताना एक 34 वर्षीय सती नेगी या बोगद्याच्या बाहेर आपल्या भावला शोधात आहे त्याच्या बाहेर येण्याची वाट बघत आहे. माझा भाऊ सोडून या जगात माझं कोणीच नाही असं ती ताई सांगत आहे.

सती नेगी यांच्या पतीचे सात वर्षांपूर्वी निधन झाले त्यांच्या साठी त्यांचा भाऊ परमिंदर बिश्त हाच शेवटचा आधार आहेत. पण पुन्हा त्यांची भेट होईल का ? हीच भीती सती ला सतावत आहे.
NCPT च्या तपोवन-विष्णुगढ़ च्या बोगद्यात सती यांचा भाऊ अडकला आहे बोगदा मोठा असल्याने आतील लोकांना बाहेर काढण्यास अनेक अडचणी येत आहेत.

सती यांनी प्रसार माध्यमं समोर आपली व्यथा मांडताना सांगितले की, शनिवारी रात्री त्यांची आणि त्यांच्या भावाची शेवटची भेट झाली होती. जाताना भावाने आपण रविवारी काम संपवून गोपेश्वरला आपल्या कुटुंबाकडे ( पत्नी, मूलं, आई) जाणार होते. एका आठवड्या भरची सुट्टी घेऊन ते आपल्या कुटुंबाकडे जाणार होते. परंतु त्या आधीच हे अघटित घडलं.

रविवारी सकाळी जस हिमखंडा कोसल्यांचे विडिओ समोर आले तसाच तातडीने सती आपल्या भावाच्या काळजी पोटी तपोवन साठी निघाली. जवळ जवळ 2 तासांनी सती तिथे पोहोचल्या. सती म्हणतात अनेक लोक येतात फोटो काढतात आणि घेऊन जातात. त्यांच्या भावाचे अधिकारीही त्याना मदत करु शकत. माझ्या भावाच्या बायकोच, मुलांचं काय? माझी आईने सोमवार पासून काहीच खाल्लं नाही आहे. आम्हाला कोणीच मदत करत नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments